बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

बुलढाणा | बुलढाण्यातील मातोळा कोविड सेंटरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णाची स्वॅब टेस्ट न करताच त्याला कोविड रिपोर्ट डाॅक्टरांनी पाॅझिटिव्ह दाखवला असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

मातोळा शहरातील रहिवासी असलेले पंडीतराव देशमुख 25 फ्रेबुवारी रोजी बुलढाण्यातील मातोळा कोविड सेंटरमध्ये अस्वस्थ वाटत असल्यानं तपासणी करण्यासाठी गेले होते. मात्र त्याठिकाणी फक्त नाव नोंदणी करुन ते घरी परतले. देशमुखांना डाॅक्टरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तपासणीसाठी बोलवलं असता, ते दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी गेलेच नाही.

देशमुखांना शुक्रवारी मातोळा कोविड सेंटरमधून फोन आला की, तुमचा कोविड अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तुम्ही पुढील उपचारासाठी सेंटरमध्ये या. तपासणीसाठी स्वॅब न देताच अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने देशमुखांना धक्का बसला. आपला रिपोर्ट पाॅझिटिव्ह कसा आला?, असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनी तात्काळ मातोळा कोविड सेंटरमध्ये जाऊन याबाबबत विचारणा केली, त्यावेळी सेंटरमध्ये त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

दरम्यान, मातोळा येथील कोविड सेंटरमध्ये किती गांभीर्याने काम चालू आहे, याचा या घटनेवरून अंदाज येऊच शकतो. रुग्णाचा स्वॅब टेस्ट न करताच त्यांचे कोविड रिपोर्ट पाॅझिटिव्ह येतात तरी कसे? याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रविंद्र पूरी यांना विचारणा केली. त्यावेळी सॅम्पल कन्टेनरला चुकून दुसऱ्याचं नाव टाकलं गेलं. या चुकीची कबुली त्यांनी दिली आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या जिल्ह्यातील कोविड सेंटर कशी चालतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

थोडक्यात बातम्या

ओडिशातील धक्कादायक घटना; पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं

तुमच्या अर्णबला जेलमध्ये टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग का?- अनिल देशमुख

“शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा?”

खळबळजनक! अज्ञात तरूणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल चोरला

‘त्या रात्री तावडे नावाच्या माणसाचा फोन आला अन्…’; मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली धक्कादायक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More