बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे तिथे काय उणे! पुण्यात साडी फक्त नेसत नाहीत तर खातातही, नक्की काय ते जाणून घ्या

पुणे | प्रत्येक महिलेला साडी म्हणलं की एक वेगळाच उस्ताह निर्माण होतो. त्यात जर पैठणी म्हटलं तर मग बोलायलाच नको. अशातच महिलांसाठी अतिशय आनंदी बाब म्हणजे महिलांच्या जीवभावाची पैठणी आता फक्त नेसताच नाही तर खाता देखील येणार आहे. हे ऐकूण कोणालाही आश्चर्य वाटेल. मात्र एका केक कलाकारामुळे हे शक्य आहे.

पुण्यातील एका केक आर्टीस्टने ही कामगिरी केली आहे. या शेफचं नाव तन्वी पळशीकर असं आहे. तन्वी या पुण्यातील जे डब्लू मॅरेट हाॅटेलमध्ये शेफ आहेत. प्रत्येक महिलेला साडी नेसन पसंत असते. अशातच जर पैठणी म्हणलं तर मग त्यांचं सौंदर्य आणखीनच खुळून येतं. त्यावर जर दागिणेे परिधान केले तर महिला आणखी खुलून दिसतात.

तन्वी यांनी पैठणी साडीच्या डिझाईनचा केक तयार केला आहे. या केकवर त्यांनी हुबेहुब पैठणीची डिझाईन तयार केली आहे. एवढच नाही तर साडीवर दागिने आणि बाजूने फुलं आणि हळदी-कुंकूचा करंडा देखील सजवण्यात आला आहे. या केकची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अनेक युझर्सने या केकचं कौतुक केलं असून ही केकची डिझाईन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, या केकबाबत बोलताना केक बनवताना सर्वात जास्त मेहनत अलंकार बनवताना घ्यावी लागली असल्याचं तन्वी यांनी सांगितलं आहे. या केकनंतर तन्वी यांनी साऊथ इंडियन साडीच्या लुकमध्ये केक तयार केला. तन्वी यांची कामगिरी पाहून त्याचे भरभरुन कौतुक केलं जात आहे.

पाहा फोटो आणि व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“मनसेत हिंमत नाही, त्यांचं आंदोलन म्हणजे भाजपचा स्पाॅन्सर कार्यक्रम”

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत करण जोहर झाला भावूक, म्हणाला…

“गोपीचंद पडळकर हे जर खऱ्या बापाची औलाद असतील तर…

करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी

कोरोनाची नवी लक्षणं आली समोर; ‘ही’ लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More