बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता?’; अभिनेत्याचा किशोरी पेडणेकरांना सवाल, म्हणाल्या…

मुंबई | बॉलिवुड अभिनेता साहिल खानने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. मात्र या भेटीसाठी त्याला रात्रीचे 11 वाजले. कारण किशोरी पेडणेकरांच्या व्यस्त वेळाकपत्रकामुळे साहिलला त्यांना भेटण्यास उशिर झाला आणि यावेळी त्याने पेडणेकरांना मिश्किलपणे काही सवाल केले आहेत. यावर पेडणेकरांनीही उत्तर दिलं. याबाबतचा व्हिडीओ पेडणेकरांनी ट्विट केला आहे.

रात्रीचे 11 वाजले आहेत काय खाता तुम्ही,? कोणता डाएट करता?, आम्हालाही आशीर्वाद द्या. मुंबईचं पुर्ण प्रेशर तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत कसं सहन करता?, असं साहिल खानने म्हटलं आहे. त्यासोबतच  आम्ही इतके तरुण असून तुम्हाला काम करताना पाहून लाज वाटते,  अशा भावना साहिल खानने पेडणेकरांशी बोलताना व्यक्त केल्या. यावर किशोरी पेडणेकरांनी आपलं उत्तर दिलं.

सकारात्मक विचार किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग हीच माझी एनर्जी आहे. चांगले विचार करा, चांगलं काम करा. वयोमानानुसार थकवा तर येतोच, पण ज्या पदावर मी बसलेले आहे तिथे माझी प्रत्येकाला गरज आहे, हे समजून मी काम करते, असं  किशोरी पेडणेकर यांनी साहिल खानला उत्तर देताना म्हटलं आहे.

दरम्यान, साहिल खान पेडणेकरांच्या कामाचा धडाका पाहून अवाक झाला. भेट झाल्यावर साहिलने किशोरी पेडणेकरांच्या पाया पडत आशिर्वाद घेतला.

 

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली”

…म्हणुन ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींसह भारतीयांचे आभार, पाहा व्हिडिओ

एक डाव लग्नाचा! पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबतच रंगवली रात्र

धक्कादायक! थुंकी लावून रोटी करायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ

तुम्ही अधिकारी खंडणी वसूल करण्यासाठी नेमले आहेत का?- राम कदम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More