बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त ‘या’ कारणासाठी सलमानसोबत काम केलं; प्रवीण तरडेंनी सांगितलं आश्चर्यजनक कारण

मुंबई | बाॅलिवुड अभिनेता सलमान खान याचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमा सध्या फ्लाॅप गेला आहे. त्यानंतर सिनेप्रेक्षकांंनी या चित्रपटावर अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. या चित्रपटात प्रविण तरडे यांनी देखील काम केलं आहे. त्याने या चित्रपटात काम का केलं याचं आश्चर्यजनक कारण प्रविण तरडेंनी सांगितलं आहे.

राधे चित्रपटात प्रवीण तरडेंनी दगडू दादा या गुंडाची भूमिका साकारली आहे. परंतू सिनेमा नंतर फ्लाॅप गेल्यानं प्रविण तरडे यांचे चाहते नाराज झाल्याचं दिसून आले आहेत. त्यानंतर याच नाराजीवरून त्यांनी या सिनेमात काम का केलं या बद्दल खुलासा केला. राधे चित्रपट पाहिल्यानंतर माझे चाहते नाराज झाले. प्रवीण दादा, इतकी छोटी भूमिका का केली?, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत, असं प्रविण तरडे म्हणाले.

अशा छोट्या भूमिका साकारूनच मी इथपर्यंत आलो आहे. भूमिका किती लहान किंवा मोठी आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. पण त्यात माझी कामगिरी कशी आहे हे महत्त्वाचं आहे. सलमान भाईसोबत मला चांगलं नातं निर्माण करायचं होतं आणि त्याच्यासोबत काम करायचा अनुभव खूपच चांगला होता. एक माणूस म्हणून मला तो आवडला, असं उत्तर प्रविण तरडेंनी दिलं आहे.

दरम्यान, मसाला चित्रपट पाहायला आणि त्यात काम करायला आवडत नसल्याचं प्रविण तरडे यांनी सांगितलं आहे. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी चित्रपट हे उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं, असं देखील प्रविण तरडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं”

भाजपला धक्का! ‘इतक्या’ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन

‘मोदी सरकारला गुजराती कंपन्यांची काळजी’; मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झापलं

10 सेकंद वाट पाहावी लागली तर आजपासून अजिबात टोल भरु नका!

2 कोटी रुपये जिंकण्याची संधी, ‘या’ सरकारी कंपनीची जबरदस्त ॲाफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More