खेळ

‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला!

लंडन | विश्वचषक अंतिम सामन्यात सुपर ओव्हर दरम्यान न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम याच्या प्रशिक्षकाचा मृत्यृ झाला. ऑकलंड येथील ग्रामर शिक्षक आणि प्रशिक्षक डेव्हिड जेम्स गॉर्डन असं त्यांचं नाव होतं.

इंग्लंंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडकडून जिमी निशम आणि मार्टीन गुप्टिल मैदानात उतरले. यादरम्यान निशमने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला अन् दुर्दैवानेे त्याचवेळी गॉर्डन यांंनी प्राण सोडला.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडचा सामना चांगलाच रोमांचक ठरला. पण अंतिमत: इंग्लंडने बाजी मारत क्रिकेट विश्वचषक आपल्या नावावर केला.

दरम्यान, जिमी निशम याने ट्वीट करुन प्रशिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विमा कंपनीच्या नफ्यात आजपर्यंत कुणी वाटा घेतला??; राजू शेट्टींची घणाघाती टीका

-भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’

-विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप; म्हणतात…

-काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार आठवड्याभरात राजीनामा देतील; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

-…तर त्यादिवशी महाराष्ट्र आश्चर्यचकित होईल; जितेंद्र आव्हाडांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या