बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इंग्लंडला ओवरथ्रोवर 6 धावा देण्याचा निर्णय चुकीचा”

लंडन | विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या विजयामध्ये अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरील ओव्हरथ्रोसह मिळालेल्या 6 धावा महत्वाच्या ठरल्या. मात्र माजी पंच सायमन टॉफेल यांनी 6 धावा देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मार्टीन गुप्टिलच्या ओव्हरथ्रोवर इंग्लंडला 6 धावा बहाल करण्याचा पंचांचा निर्णय चुकीचा होता. पंचांनी 6 धावा ऐवजी 5 धावा देणं अपेक्षित होतं, असं सायमन टॉफेल यांनी म्हटलं आहे.

आयसीसीच्या 19.8 च्या नियमानुसार चेंडू थ्रो करण्यापूर्वी फलंदाजांनी एक धाव पूर्ण करुन दुसरी धाव घेण्यासाठी एकमेकांना ओलांडलं असलं पाहिजे तरच ती धाव विचारात घेतली जते.

दरम्यान, त्यावेळी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि दक्षिण अफ्रिकेचे मारियस इरॅसमस हे पंच मैदानावर होते.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची डरकाळी; ‘मुख्यमंत्री आमचाच होणार’!

-रामदेव बाबांच्या पतंजलीवर राज्य सरकार मेहेरबान; 400 एकर जमिनीला चार दिवसात मंजूरी

-धरण फुटून उद्ध्वस्त झालेलं तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी आनंदाची बातमी

-“हिंदी भाषेमुळे संसदेतल्या चर्चांची पातळी खालावली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More