बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक ! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आता आढळली नवी बुरशी

पुणे | कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून देशात कोरोनानं चिंताजनक वातावरण निर्माण केलं आहे. कोरोनाची लाट आटोक्यात असतानाच नवनवीन व्हेरिएंट डोकं वर काढत आहेत. अशातच पुण्यातून आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये नवीन बुरशी आढळून येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या नवीन बुरशीचे रुग्ण आढळले असून चार रुग्णांमध्ये ही नवीन बुरशी दिसली आहे. या बुरशीच्या नवीन प्रकारामुळे आरोग्य विभागाची चिंताही वाढली आहे.

नवीन बुरशी झालेल्या रुग्णांना महिन्यानंतर सौम्य ताप आला. तसेच त्यांच्या पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्याच्या तक्रारी आल्या. सुरुवातीला या रुग्णांना स्नायू दुखी बरे होण्यावर औषधे देण्यात आली. मात्र या संक्रमणामुळे रुग्णांच्या हाडांवरही परिणाम होत असल्याचं, तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यातला वाढता संसर्ग यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोकाही अजून वाढला आहे. कोरोना अधिक वेगानं फैलावत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेनं अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा इशारा दिला आहे.

थोडक्यात बातम्या –  

आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवसाला केलेल्या ‘या’ कामाचं सर्वत्रच कौतुक

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

“लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री”

काय बोलता? तंबाखू खायचं व्यसन 12 हजार वर्षांपूर्वीचं?

मुकेश अंबानींची ‘या’ परदेशी कंपनीत मोठी गुंतवणूक; भारतीय उद्योगक्षेत्राला होणार फायदा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More