बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना काळात रक्ताचा मोठा तुटवडा, टाटा रुग्णालयाने केलं महत्त्वाचं आवाहन

मुंबई | कोरोनानं जगभरात कहर केला आहे. कोरोनाचा शिरकाव आटोक्यात आला असताना पुन्हा एकदा आता यामध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच कोरोना काळात लोकांचं रक्तदान करण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. त्यामुळे आता मुंबईत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याचं दिसून येत आहे. अशातच मुंबईत रक्ताचा पुरवठा कमी पडू लागल्यानं आता टाटा मेमोरियल सेंटर नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीएमसीनं म्हटलं की, टाटा मेमोरियल सेंटरमध्ये सध्या रक्ताचा पुरवठा अपुरा पडत आहे. लोकांनी पुढे येऊन रक्तदान करा. रक्तदान करणं पुर्णपणे सुरक्षित असून तुमच्यामुळे एखाद्याचा प्राण वाचू शकतो. याशिवाय त्यांनी ब्लड बॅंकेचा नंबरही दिला आहे.

दरम्यान, रक्तदान करण्यासाठी तुम्ही 022-24177000 या नंबरवर संपर्क साधू शकता. सध्या टीएमसी हाॅस्पीटलला दररोज 60% युनिट रक्ताची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी पुढे येत रक्तदान करण्याचं आवहन केलं जात आहेत.

थोडक्य़ात बातम्या –  

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

सिद्धार्थच्या आत्म्याशी संवाद साधल्याचा ‘या’ व्यक्तीनं केला दावा, संवादात सिद्धार्थ म्हणतो…

माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा लोक मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात- अमृता फडणवीस

‘आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय’; मुनमुन संतापली

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More