औरंगाबाद | कोरोना विषाणूच्या ओमिक्राॅन नावाच्या व्हेरियंटनं जगभर हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता सगळेच देश धास्तवून गेले आहेत. ओमिक्राॅनमुळे तिसरी लाट येऊ शकते, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण आहे.
कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील आकडेवारी तर धडकी भरवणारी आहे. यातच मराठवाड्यातील आकडा या चिंतेत आणखी भर टाकणारा ठरत आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 18.25 टक्के असून, जालना 3.36, परभणी 3.09, हिंगोली 4.15, बीड 2.83, उस्मानाबाद 10.14, लातूर 20.16 असून, नांदेड जिल्ह्याचा सर्वाधिक 24.17 टक्के पॉझिटिव्ह रेट आहे.
दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्राॅन हा कोरोना महामारीच्या अंताची नांदी असू शकेल. त्यामुळे खरंच आता कोरोनाचा अंत होणार का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत.
थोडक्यात बातम्या –
धक्कादायक! ‘इतक्या’ वेळा होऊ शकते ओमिक्राॅनची लागण
सेल्फ टेस्टिंगसाठी मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, वाचा नवी नियमावली
“मराठी भाषेवर इतकं प्रेम आहे तर सरकारनेच दुकानांच्या सर्व पाट्या बदला”
‘प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज नसते’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला
राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका
Comments are closed.