बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! Omicron मुळे ‘या’ महिन्यात येणार देशात तिसरी लाट?

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट थैमान घालत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनचा (Omicron) संसर्ग दिवसागणिक वाढत चालला असून नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. यामुळे आता आरोग्य विभागाचंही टेंशन वाढलं आहे.

ओमिक्राॅनचा (Omicron) वाढता संसर्ग पाहता लवकरच देशात कोरोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ओमिक्राॅन व्हेरिएंटची ही लाट फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत तीनपट जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.

ओमिक्राॅनच्या संसर्गाची सुरुवात दक्षिण अफ्रिकेमधून झाली होती. मात्र आता भारतामध्ये देखील या विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केली आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या 23 वर पोहचली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमध्येही डेल्टामुळेच तिसरी लाट आली होती. नवा ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटची जागा घेत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे देशातही तिसरी लाट येणार का याविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या  – 

“श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असं ठरवलंंय”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ?, वाचा आजचे ताजे दर

कोरोना चाचणी झाली आता आणखी स्वस्त; राजेश टोपेंची मोठी घोषणा

Omicron | ‘आगामी काळात आतापेक्षा जीवघेणी आणि भयानक साथ येणार’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

धक्कादायक! Omicron चा लहान मुलांना जास्त प्रमाणात धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More