बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाह रे पठ्ठ्या! ‘या’ मराठमोळ्या मुलाने इन्स्टाग्रामवरील ती कमी दाखवली अन् कंपनीने दिले 22 लाख रुपये

मुंबई | महाराष्ट्रात राहणाऱ्या 21 वर्षीय मयुरला सध्या फेसबुक कंपनीनं तब्बल 22 लाख रुपयांचा ईनाम दिला आहे. मयुरला हा ईनाम मिळण्यामागे कारणही अगदी तसंच आहे.  फेसबुकचा प्लॅटफॉर्म असणाऱ्या इन्स्टाग्रामवरील एका गंभीर त्रुटीविषयी मयुरने फेसबुकला कळवले. यामुळे कंपनीने मयुरला हा ईनाम दिला आहे.

इन्स्टाग्राम वरील प्रायव्हेट अकाउंट तेव्हाच पाहिलं जाऊ शकतं जेव्हा दोन्हा अकाउंट्स एकमेकांना फॉलो करत असतील. परंतु इंस्टाग्राममधील बगमुळे कोणतेही खासगी खाते पाहिले जाऊ शकते. मयूरने याबद्दल फेसबुकला माहिती दिली आणि फेसबुकने इन्स्टाग्रामवर ही त्रुटी असल्याचं कबूल केलं.

आत इन्स्टाग्रामने ही त्रुटी दुरुस्त केली आहे आणि फेसबुकच्या ईमेलद्वारे मयूरला 22 लाखांच्या ईनामाविषयी माहिती दिली आहे. फेसबुकने मयूरला पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे की, या समस्येचा आढावा घेतल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आहे की आपल्याला 30 हजार डॉलरचं बक्षीस देण्यात येईल.

दरम्यान, याविषयी फेसबुकने म्हटलं आहे की, मयुरने इन्स्टाग्रामची जी त्रुट निदर्शनास आणून दिली आहे आणि फेसबुकला रिपोर्ट केली आहे. या त्रुटीमुळे वाईट हेतू असणारे वापरकर्ते इन्स्टाग्रामवर त्याचा फायदा घेऊ शकतात. सध्या कंपनीने ही त्रुटी दुरुस्त केली आहे.

थोटक्यात बातम्या – 

ब्रेकींग! शिवसेना भवनासमोर आंदोलनात भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

“संभाजीराजे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, तुम्ही उद्याच मुंबईला या!”

‘…त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं’; हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरात कबुली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More