कारागृहात जाताच ढसाढसा रडला पैलवान सुशीलकुमार, अशी गेली पहिली रात्र!
नवी दिल्ली | ऑलिम्पिकमध्ये भारताला दोनवेळा पदकाची कमाई करून देणारा सुशील कुमार गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याचं कारणांमुळे चर्चेत आहे. सुशिल कुमारवर सागर या युवा कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे. गेल्या 18 दिवसांपासून तो फरार होता. दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. ऑलिंपिक पोडियमवर अभिमानाने उभं राहणारा सुशील गजाआड आहे. सुशील कुमारचा ताबा सध्या मॉडल टाऊन पोलिसांकडे आहे. सुशीलने आपल्या जीवनातील कारागृहातील पहिली रात्र कशी काढली याबाबत मॉडेल टाऊन पोलिसांनी माहिती दिली आहे.
पोलीस ठाण्यात गेल्यावर सुशीलला आणि त्याचा साथीदार अजयला कोठडीमध्ये ठेवण्यात आलं. कारागृहात गेल्यावर सुशील जोरजोरात रडत होता. त्याला इतर कैद्यांप्रमाणे खाली बसवण्यात आलं. त्यावेळी अधिकाऱ्यांसमोर सुशील लहान मुलाप्रमाणे रडत असल्याचं सांगण्यात आलं.
सुशीलने कारागृहातील आपली पहिली रात्र ही पुर्णपणे जागून काढली. त्याने जेवण करण्यास नकार दिला. त्या रात्री तो खूपवेळा रडला आणि फक्त दोन तास त्याने झोप घेतली. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी उठवण्यात आलं आणि त्याचा साथीदार अजयसोबत त्याने जेवण केलं, अशा प्रकारे ऑलिम्पिकवीर सुशील कुमारची कारागृहातील पहिली रात्र गेली.
दरम्यान, 5 मेला राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये दोन गटात मारामारी झाली. या मारहाणीमध्येनॅशनल ज्युनिअर मेडल विजेता सागर धनकरला जबर मारहाण झाली. सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर सुशील कुमार फरार झाला आणि दोनवेळा पोलिसांनी चकमा देण्यात तो यशस्वी ठरला मात्र त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
थोडक्यात बातम्या-
…नाहीतर ही शेवटची चड्डीही काढेन; नाशिकमधील आंदोलनाची देशभरात चर्चा
हार मानेल ती आई कसली! 2 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानं आईनं घेतला ‘हा’ निर्णय
उद्यापासून भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम होणार बंद?; जाणून घ्या
“शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?”
भारतातील कोरोनाचा अनुभव सांगताना ‘या’ क्रिकेटपटूला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ!
Comments are closed.