विजय चौधरीने दंड थोपटले, ‘हिंद केसरी’च्या आखाड्यात उतरणार!

पुणे | ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाहीये. तर तो यंदा ‘हिंद केसरी’च्या आखाड्यात उतरणार आहे. ‘महास्पोर्ट्स‘शी बोलताना त्याने ही माहिती दिली. 

ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर नियमानूसार खेळता येत नाही. मात्र महाराष्ट्र केसरी खेळणार नसलो तरी यंदा हिंद केसरी खेळणार आहे, असं विजयनं म्हटलंय. 

दरम्यान, विजय चौधरीची डीवायएसपीपदी नियुक्ती झाल्याने त्याचं सध्या प्रशिक्षण सुरु आहे. मात्र तरीही त्याने हिंद केसरीसाठी कसून तयारी सुरु केलीय.