बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबादमधील ‘या’ आमदाराने भर चौकात केली बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण; पाहा व्हिडीओ

औरंगाबाद | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असतानाच औरंगाबादचे शिवसेना आमदार आंबादास दानवे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दानवे स्वत: औरंगाबादच्या एका चौकात वाहतूक सुरळीत करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ दानवे यांनी स्वत: ट्वीटरवर शेअर केला आहे.

माहितीनुसार, शहरातील क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे जवळच शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात असलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे काही कार्यकर्त्यांसह या चौकात दाखल झाले. दानवे यांनी यावेळी ट्रॅफिक पोलिसांना वाहतूक कोंडी फोडण्यास मदत केली. वाहतूक कोंडी फोडत असताना दानवेंनी एका बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण देखील केली.

या रिक्षाचालकाने आता औरंगाबाद पोलीस ठाण्यात दानवेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संबंधित रिक्षाचालकाचं नाव अजय जाधव असं आहे. अजय जाधव यांच्या तक्रारीनंतर आता औरंगाबाद पोलीस दानवेंविरुद्ध काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाविषयी बोलताना आंबादास दानवे म्हणाले की, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मी पोलिसांसह प्रयत्न करत होतो. यावेळी एका बेशिस्त रिक्षाचालकाला शिस्त शिकवण्याचा प्रयत्न मी केला. मी एक आमदार आहे, मात्र त्याअगोदर एक शिवसैनिक देखील आहे. रिक्षाचालकाच्या बेशिस्तपणामुळे माझ्यातील शिवसैनिक जागा झाला.

थोडक्यात बातम्या – 

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

‘डेल्टा प्लस’बाबत सध्याच्या क्षणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही- राजेश टोपे

शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

“बार, पब, डिस्को चालतात मग गणेशोत्सव का नाही?”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More