Top News अमरावती महाराष्ट्र

महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रॅपीड कोरोना चाचणी केली अन् रिपोर्ट आला….

अमरावती |   महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना चाचणी केली आहे. त्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे,

सध्या राजकीय पक्षांचे नेते, मंत्री तसंच शासकिय अधिकारी विविध गावांना भेटी देऊन कोरोना उपायोजनांचा आढावा घेत आहेत. यावेळी अनेक लोकांच्या संपर्कात नेते अधिकारी येत असतात. याचाच परिणाम अनेक लोकप्रतिनिधींना तसंच अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे प्रत्येकाकडून काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे सांगत महिला बालकल्याण मंत्री तसंच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुंबईहून परतताच स्वतःसह सर्वांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेतली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्या निवासस्थानी परतल्या.

 

 

कोरोनाबाधित व्यक्ती आढळलेल्या विविध गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री ठाकूर यांनी घेतला. यावेळी उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढवले.

गत दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जनमानसांनी मास्क लावणे, हात नेहमी स्वच्छ धुणे, निजंर्तुकीकरण आदी सवयीसह सामाजिक वर्तणात बदल आणला तरच कोरोनावर मात करता येईल, असं ठाकूर म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातलं सरकार स्वार्थासाठी स्थापन झालंय, कमाई करणं हाच त्यांचा उद्देश, भाजपाध्यक्षांचा घणाघात

“कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या”

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा हात, आव्हाडांनी सांगितलं टॉप सिक्रेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या