अमरावती महाराष्ट्र

बडनेऱ्यात घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद, गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी- यशोमती ठाकूर

मुंबई | बडनेऱ्यातील घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी. आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलीये. असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांनी अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब बसवावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेत.

बडनेरमध्ये तरुणीच्या गुप्तांगातून घेतलेला स्वॅब पोलिसांनी जप्त केला असून, आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीचा बडनेऱ्यातील कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये गुप्तांगातून स्वॅब घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी गुन्हे दाखल केला आहे. आरोपी अल्पेश देशमुख याला अटक करण्यात आली असून 31 जुलैपर्यंत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाय घटनेच्या वेळी लॅबमध्ये उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी दिली आहे.

बडनेऱ्यात अत्यंत घृणास्पद असं कृत्य घडलंय. गुन्हेगारास कठोर शिक्षा मिळावी आणि सदर व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवून अटक केलीये. यापुढे असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. आणि या समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिलेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर, पण…- उद्धव ठाकरे

अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार- रामदास आठवले

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले…

हार्दिक पांड्या झाला बाबा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला इशारा, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या