गुजरातमध्ये मोदी सरकारविरोधात यशवंत सिन्हा मैदानात!

अहमदाबाद | आपल्याच सरकारवर निशाणा साधणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आता गुजरात विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. 14 नोव्हेंबरपासून त्यांच्या 3 दिवसाच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. 

‘लोकशाही बचाओ अभियान’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेनं सिन्हांच्या या दौऱ्याचं आयोजन केलंय. भाजपसाठी धक्कादायक बाब म्हणजे ही संस्था काँग्रेसशी संबंधित आहे. 

यशवंत सिन्हा यांनी यापूर्वीच मोदी-शहा-जेटली तिकडीवर जोरदार हल्ला चढवला होता. आता गुजरातमध्ये ते व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करणार असल्याने सगळ्यांचं लक्ष त्यांच्या दौऱ्याकडे लागलं आहे.