बंगळुरु | कर्नाटकात काँग्रेस-जनता दल सेक्युलरचे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या आमदारांना भाजप नेते बी. एस, येडियुरप्पा यांनी 200 कोटींची ऑफर दिल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 50 कोटींची ऑफर दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
येडियुरप्पा फक्त मोहरा आहेत. पण त्यांच्या मागून नरेंद्र मोदी आणि अमित शहा आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही वेणुगोपाल यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी येडियुरप्पा आणि काँग्रेस-जदसे आघाडीतील एका आमदाराच्या भावाशी झालेल्या संभाषणाची क्लिप शुक्रवारी प्रदर्शित केली होती.
महत्वाच्या बातम्या-
–राहुल गांधीच्या जीवनावर आधारित ‘माय नेम इज रागा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
–हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला!
-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले
-“बारामतीसाठी आधी उमेदवार द्या, मग बारामती जिंकण्याची भाषा करा”
–संतापजनक! सरकारवर टीका केली म्हणून अमोल पालेकरांचं भाषण अर्ध्यावरच थांबवलं