पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे.
याचदरम्यान, जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या एका कोरोनाबाधित आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घडली आहे. सुदैवाने जुळ्या मुलांची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. 24 तासाच्या आतच जुळ्या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
35 वर्षीय या महिलेच्या प्रसुतीची वेळ जवळ आली होती, त्यातच तिला 4 एप्रिलला त्रास होऊ लागला. तिला वायसीएम रुग्णालयात दाखल करताना तीची ऑक्सिजन लेव्हल खालावली होती. त्यामुळे अँटीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ऑपरेशन करुन प्रसुती करण्यात आली आणि तिने जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. पण त्यानंतर आईची प्रकृती खालावत गेली आणि आज सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार आहेत.
थोडक्यात बातम्या –
आयपीएल सुरु होण्याआधीच धोनी फुल्ल फॅार्ममध्ये; CSKनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ
चुकून गोळी लागून झाला मित्राचा मृत्यू, अपराधी भावनेतून तीन जणांची आत्महत्त्या
फखर जमान रनआऊट प्रकरण, ‘या’ कारणामुळे क्विंटन डी कॅाकला क्लीनचीट!
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता पुण्यातील ‘या’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत!
अदानी समूहाची गरूडभरारी! ‘100 अब्ज डाॅलर्स’ कमवत ठरली देशातली ‘या’ क्रमांकाची मोठी कंपनी.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.