बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | सातत्यानं साजरा होणाऱ्या योग दिनाचे यंदा सातवे वर्ष आहे. योग दिनाला जगभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत असून या दिवशी अनेक ठिकाणी एकत्रितपणे योगसाधना केली जाते. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचं महत्व सांगितलं.

योगानं लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी संकटाचा सामना केला आहे. लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे, असं यावेळी मोदींनी म्हटलं.

आज जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे, तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. कोरोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

दरम्यान, योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे. बाहेर कितीही संकट असलं तरी आपल्याकडे तोडगा असल्याचं योगा सांगत आहे, असंही मोदी जागतिक योग दिनानिमित्त म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या – 

‘या’ ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या तालावर 100 लोकांनी सलग दोन तास केली योगासने

36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही; मराठा क्रांती आंदोलनाबद्दल संभाजीराजेंचं मोठं विधान

“काँग्रेस अन् राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”

मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वाची माहिती

“अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, पण आता…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More