बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार!

लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात बॉलिवूड गुंतवणूक करण्यासंबंधी ते बैठक घेणार आहेत.

१ डिसेंबरच्या रात्री योगी आदित्यनाथ लखनऊहून मुंबईसाठी रवाना होणार असून २ डिसेंबरला ते बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये जाणार आहेत. त्यानंतर तेथील कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी निमंत्रण देणार आहेत.

या बैठकीला दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्मसिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

लहानपणी माझंही लैंगिक शोषण झालं; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक दावा

“हजारो कुटुंबांच्या जीवनात आनंदवन फुलवणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावं?”

शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

‘आहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल सांगून टाका…’; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More