बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘यू आर दी मोस्ट ॲक्टिव्ह मेयर’ म्हणत राज्यपालांनी केलं ‘या’ महिला महापौरांचं कौतुक

मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी किशोरी पेडणेकर यांचं तोंड भरून कौतुक केलं असल्याचं समजत आहे. यू आर दी मोस्ट अॅक्टिव्ह मेयर, तुम्हाला तुमच्या पक्षातील लोकंही घाबरत असतील, अशा शब्दात राज्यपालांनी पेडणेकरांचं कौतुक केलं आहे. राज्यपालांना भेटून आल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शहराची प्रथम नागरिक म्हणून मी त्यांचं अभिष्टचिंतन करायला गेले. त्यावेळी एखाद्या वडिलांनी आपल्या मुलीचं कौतुक करावं, तशा पद्धतीनं राज्यपाल आणि माझं बोलणं झालं असल्याचं पेडणेकरांनी सांगितलं. इतकंच नाही तर मला प्रोटोकॉल रोखतो, नाहीतर मलाही तुमच्या घरी यायला, सर्वांना भेटायला आवडलं असतं, असंही राज्यपाल म्हणाल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना राजभवनावर जाऊन शुभेच्छा दिल्या. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता अशाप्रकारे 4000 रुपये मिळवता येणार; वाचा सविस्तर

“12 सदस्यांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी वाढदिवसानिमित्त राज्याला गोड भेट द्यावी”

‘समांतर 2’ वेब सिरीज ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

होय, शिवसेना गुंडगिरी करते आम्ही सर्टिफाईड गुंड, सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर…

राखी सावंतनं सांगितली लस घेण्याची अनोखी पद्धत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More