नवी दिल्ली | लठ्ठपणा (obesity) किंवा वाढतं वजन ही हल्लीची वाढती समस्या बनली आहे. वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. बदलती जीवनशैली, बैठीजीवनपद्धती अशा अनेक कारणांमुळे वजन वाढते. हे वजन कमी करण्यासाठी कोणी डाएट करतं तर कोणी व्यायाम करतात. अनेक आजारामध्ये आयुर्वेदाला महत्व दिलं जातं. त्याचप्रमाणे वजन कमी करण्याचेही काही आर्युवेदिक (Ayurvedic) प्रकार तुम्ही ट्राय करू शकता.
हळद ही जखमेवर अत्यंत उपयोगी मानली जाते. याच हळदीसोबत आलं आणि मधाचं सेवन केल्यानं पोटाची अतिरिक्त चरबी (Fat) कमी होण्यास मदत होते. या तीन गोष्टीचे एकत्र सेवन करावे. लिंबूपाण्यात पेक्टिन आणि पाॅलिफेनाॅल असतात. यामुळे तुमची भूक कमी होते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने वजन (weight) कमी होण्यास मदत होते.
बाला किंवा चिकणा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अल्कलाॅइड्स (Alkaloids) भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील चरबी कमी करण्यास हे मदत करतात. यामुळे वजन कमी होण्यास लाभ होतो. कोमट पाण्यासोबत मध आणि दालचिनीचे सेवन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. सगळ्यात प्रभावशाली माध्यम जे वजन कमी करण्यासाठी मदत करतं ते म्हणजे मेथी. मेथीचे दाणे रात्री भिजत घातल्यास आणि सकाळी उठून त्याचं सेवन केल्यास लवकरात लवकर वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
दरम्यान, वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज (Diabetes), मणक्यामध्ये गॅप होणे, हार्ट अटॅक यारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असल्यास या आयुर्वेदिक पर्यायांचा नक्की विचार करा.
थोडक्यात बातम्या
‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड
सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित
मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…
पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Comments are closed.