बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही नारळ फोडत रहा, निवडणुकीत उमेदवारी मात्र मला मिळो”

सांगली | गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभेच्या जागेवर कोणाला तिकिट मिळणार?, असा सवाल विचारला जात होता. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्ता संघर्ष पाहायला मिळत होता. अखेर ही जागा काँग्रेसच्या खात्यात आली. पण ही जागा काँग्रसच्या खात्यात आली असली तरी या जागेसाठी काँग्रेसकडून दोन प्रबळ उमेदवार असल्यानं काँग्रेसची चिंता वाढली होती. त्यानंतर पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आता हाच मुद्दा पुन्हा समोर येताना दिसतोय.

स्वातंत्र्यादिनाच्या कार्यक्रमात पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील या दोन पाटलांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. स्वातंत्र्यादिनाच्या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांना नारळ फोडण्याचा आग्रह केला. परंतु, नियोजनाप्रमाणे पृथ्वीराज पाटील नारळ फोडतील असं, विशाल पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर जयंत पाटलांनी पृथ्वीराज पाटील यांना नारळ फोडण्यास सांगितलं.

त्यावेळी, पृथ्वीराज यांनी नारळ फोडण्याचं काम करावं पण, ऐनवेळी उमेदवारीचं तिकिट आम्हाला मिळो, असं मिश्किल वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. त्यानंतर पृथ्वीराज पाटील यांनी जराही वेळ न घालवता विशाल पाटलांना उत्तर दिलं. तुम्हाला नक्की तिकिट मिळो, पण लोकसभेचं मिळो, असं पृथ्वीराज पाटील म्हणाले. त्यानंतर जयंत पाटलांसोबत सर्व उपस्थित नेते हसू लागले.

दरम्यान, उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने देखील आपली दावेदारी सादर केली. राष्ट्रवादीचे काँग्रेस शहर प्रदेशाध्यक्ष संजय जाधव यांनी देखील राष्ट्रवादी सांगलीच्या जागेवर दावेदारी सादर करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर देखील मंजावरचे सर्व नेते हसत होते. या कार्यक्रमात एका जागेसाठी तीन उमेदवार दावे करताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेत कोणाला नेमकी तिकिट मिळतंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘लष्करात भरती करुन आम्हालासुद्धा देशसेवेची संधी द्या’; तृतीयपंथियांची पंतप्रधानांकडे मागणी

केंद्रात काही नेते फक्त भाषणं देतात, गडकरी प्रामाणिकपणे काम करतात- बच्चू कडू

“जनतेनं फेकून दिलं होतं, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे तुम्ही आज सत्तेत आहात”

“भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More