नाशिक | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. या प्रकरणा संंबंधित सोशल माध्यमांवर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरत थेट संजय राठोड यांच्यावर पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र चित्रा वाघ यांच्या समर्थकांकडून गलिच्छ प्रकार सुरू झाल्याचं दिसत आहे.
तुम्ही मला कीतीही त्रास दिला, माझे आणखी काही फोटो एडिट करुन व्हायरल करायचा प्रयत्न केला, कुणाचीही तोंड फोटोला चिपकवली तरी मला काहीच फरक पडत नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे, अशा शब्दात चित्रा वाघ कडाडल्या आहेत. चित्रा वाघ यांचे एडिट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत चित्रा वाघ आणि वनमंत्री संजय राठोड एकत्र दिसत आहेत. या फोटोंवरुन चित्रा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत बोलताना आपली भूमिका मांडली आहे.
माझे खासगी फोटो काढून एडिट करुन तुम्ही काय साध्य करणार आहात? किंवा तुम्हाला काय साध्य करायचं आहे? मिनिटामिनिटाला फोन करुन मला त्रास दिला जातो आहे. मला काम करता येत नाहीये. या संदर्भात सर्व सीजींपासून डीजीपर्यंत सर्वांना फोटो पाठवले आहेत. इतका त्रास देण्याचं काय कारण आहे? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, एडिट फोटोंची तक्रार करण्यासाठी मुंबई पोलिसांसोबत माझं बोलणं झालं आहे. त्यांनी मला एफआयआर करण्याचा सल्ला दिला आहे. पण मी सध्या प्रवासात आहे. जोपर्यंत मी पोलीस ठाण्यात तक्रार करत नाही तोपर्यंत मला त्रास सहन करावा लागणार आहे’, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या –
संजय राठोड समर्थकांकडून गलिच्छ प्रकार सुरु, चित्रा वाघ यांना केलं जातंय टार्गेट!
पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
‘…तर 1 मार्च पासून दूध 100 रूपये प्रतिलिटर दराने विकणार’; शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा
‘ये बंगाल की प्रमुख जनता है और….’; भाजपमध्येही होत आहे ‘पावरी’, पाहा व्हिडीओ
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि शरद पवारांकडून अपेक्षा – विनोद तावडे
Comments are closed.