बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…पण जेव्हा सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही”

मुंबई | काल शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. त्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवलं. त्यावर आता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा. पण ज्या दिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी सरकार पाडून तर दाखवा, असं म्हटल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्ही सरकार चालवून तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करून तर दाखवा तसेच काम करून तर दाखवा’, असं म्हणत उद्धव ठाकरेंना कोपरखळ्या मारल्या आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे उपऱ्यांचा पक्ष म्हणून भाजपला हिणवतात पण त्यांच्या स्वतःच्या पक्षाची अवस्था काय आहे? अनेक वेळा भाजपने शिवसेनेकडे उमेदवार नसताना त्यांना उमेदवार दिल्याची आठवणही फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना करून दिली आहे. तसेच जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग रावते, शिंदे आणि देसाई यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा प्रश्न विचारत नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

पुण्यात डिझेलची शंभरी पार तर दुसरीकडे पुणेकरांचा रिक्षाप्रवासही महागला

अजित पवारांच्या नातेवाईकांकडे आयकर विभागाने जप्त केली तब्बल एवढ्या कोटींची बेहिशेबी मालमत्ता

पुढच्या वर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? धोनीने दिलं हे उत्तर

“हिंदूहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ संपता संपेना, परिक्षा केंद्रावरून पुन्हा गोंधळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More