बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक आणखी बाकी आहे- काँग्रेस

मुंबई |  ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील राजकारणात भूकंप आला आहे. एकीकडे काँग्रेसच्या 22 आमदारांनी आपला राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक अजून बाकी आहे, असा दावा काँग्रेसने केलाय.

मास्टर स्ट्रोक काय आहे? हे मात्र काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या 30 वर गेली आहे, असं भाजपने म्हटलंय. काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार बहुमताचा आकडा कसा गाठणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

यातून एक नवीन गोष्ट समोर येणार आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल, असं उत्तर शर्मा यांनी दिलं. बेंगळुरूमधून 19 आमदारांचे राजीनामे सोबत आणले आहेत. ही संख्या वाढून 30 पर्यंत जाऊ शकते. अनेक काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे, असं भाजपचे नेते भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं.

कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतलेत. यानंतर नाराज आमदारांना मंत्रीपद देऊन कमलनाथ त्यांना काँग्रेसमध्ये आणतील, अशी चर्चा आहे.

ट्रेडिंग बातम्या-

‘महाविकास आघाडीचा मोठा नेता आमच्या संपर्कात’; लवकरच महाराष्ट्रात भूकंप?

महत्त्वाची बातमी – पुण्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली

महत्त्वाच्या बातम्या-

ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजकीय भूकंपानंतर त्यांच्या मुलानं केलं हे भावनिक ट्विट

मी येतोय, तुम्ही सराव सुरु करा; आव्हाडांनी गणेश नाईकांना ललकारलं!

“शिक्षण म्हणजे वाघीणीचं दूध… सध्या या वाघीणीच्या दुधात पाणी मिसळल्यासारखं वाटतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More