बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानच्या तरूण मुलींवर मोठं संकट, ‘या’साठी सुरू आहे जबरदस्ती!

नवी दिल्ली | तालिबानच्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी काबूल मधून पलायन केलं आहे. त्यानंतर आता तालिबानचं अफगाणिस्तानवर एकहाती वर्चस्व राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तालिबान राजवट पुन्हा येऊ लागल्याने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी केली आहे. त्यावेळी दहशतवाद्यांकडून केलेल्या गोळीबारात 5 लोकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील तरूणीही आता संकटात सापडल्या आहेत.

द सन वेबसाईटने केलेल्या दाव्यानूसार तालिबानी दहशतवादी आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तरूण मुलींचा शोध घेत आहे. त्यांना पळवून नेऊन त्यांना सेक्स गुलाम बनवलं जात आहे. तसेच तालिबानचे नेतेही अफगाणिस्तानच्या मुलींचं अपहरण करून त्यांना बळजबरीने सेक्स गूलाम बनविण्यासाठी त्यांना ताब्यात घेत आहे.

तालिबानच्या कब्जात असलेल्या भागातील इसमांना अफगाणिस्तानमधील 15 ते 45 वर्ष वयोगटातील तरूण आणि विधवा महिलांची यादी पाठवण्यास सांगितली होती. या महिलांचे लग्न तालिबानच्या दहशतवाद्यांशी करून देणार होते. त्यानंतर दहशतवादी आता घराघरात जाऊन महिलांना पळवून नेत आहे.

दरम्यान, इस्लामिक स्टेट ही संघटना महिलांना सेक्स गूलाम बनविण्यासाठी कुख्यात आहे. तालिबानचे हे कृत्य इराण आणि इराकमध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रुरतेसारखेच आहे. मागील काही वर्षांत तेथे अडकलेल्या महिलांनी स्वत:ची सुटका करून घेत आयएसआयएस दहशतवादांच्या कृत्यांचा भांंडाफोड केला होता.

थोडक्यात बातम्या-

“लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू”

मोठ्या भावाला वाचवण्यासाठी छोट्या भावाची पाण्यात उडी; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

“फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची?”

आकाशाकडे बोट दाखवत कोहली थेट रिषभ पंतवर भडकला; पाहा व्हिडीओ

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More