पुणे महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांचा चोप

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी कोल्हापुरच्या एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन चांगलांच चोप दिला आहे.

ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, असं वक्तव्य सुळे यांनी केलं होतं. याविषयीच्या बातमीची पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर करण्यात आली होती. तेव्हा कमेंटमध्ये तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केलं होतं.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाचा शोध घेत त्याच्या घरी जाऊन त्याला चोप दिला. तसेच त्याला कॅमेरासमोर माफीही मागायला लावली.

तरुणाची लेखी माफिही घेण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही महिलेविषयी आक्षेपार्ह कमेंट करणार नाही, असं त्याने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-…तर मला उपपंतप्रधानपद मिळावं; चंद्रशेखर राव यांची मागणी

-भाजपला 185 जागांवरच समाधान मानावं लागेल; जितेंद्र आव्हाडांचं भाकित

-भाजपचे मंत्री दुष्काळग्रस्त भागात जायला घाबरतात; अजित पवारांचा टोला

-लोकांना माझ्यात गोपीनाथ मुंडेंची छबी दिसते- धनंजय मुंडे

-मणिशंकर अय्यर शिविगाळ करणाऱ्या टोळक्यांचा म्होरक्या; भाजपचा पलटवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या