बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली | देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांच्या निकालांचे कल हाती येत आहेत. यापैकी पंजाबमध्ये ‘आप’ने जोरदार मुसंडी मारली आहे. आपच्या या विजयामुळे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. पक्षाच्या दिल्लीतील कामगिरीमुुळे लोकांना आपला कौल दिल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.

या होणाऱ्या क्रांतीसाठी पंजाबमधील जनतेने आभार, असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांचा फोटो ट्विट केला आहे. पंजाबमध्ये आप सद्यस्थितीत 90 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भगवंत मान हे मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चितच झालं आहे.

गोव्यात आपने दोन जागांवर मुसंडी मारली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजयी उमेदवारांचे आभार मानले आहेत. कॅप्टन वेंझी आणि क्रूझ यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. ही तर गोव्यातील प्रामाणिक सुरूवात आहे, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, पंजाबमध्ये दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा दोनही जागांवर पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांना तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जनतेनं नाकारल्याचं दिसत आहे. आता आपची पुढील रणनीती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘म्याँव म्याँवचा आवाज ऐकायला येत नाहीये भाई…’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं

“2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, तर जनताच….”

गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा ‘नोटा’ला जास्त मतं

“…अन् आता आम्ही थांबणार नाही, लोकसभाही लढू”

“उद्धव ठाकरे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More