बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं, आता आदित्य ठाकरेंकडून मिळालं मोठं बक्षीस!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राणे यांच्या मुंबईतील जुहू निवासस्थानाबाहेर काही कार्यकर्त्यांनी तुफान राडा घातला होता. यामध्ये मोहसीन शेख नावाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं होतं. त्याच मोहसीन शेखला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस मिळालं आहे. त्याची युवासेना सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राणे-शिवसेना वादात मोहसीन शेख हा जुहू येथे नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर झालेल्या आंदोलनात अग्रभागी होता. पोलिसांनी त्याला यावेळी कपडे फाटेस्तोवर मारलं होतं. पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्यानं त्याला रूग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर या मारहाणीची क्लीप सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली होती, मात्र या कामगिरीचं कौतुक म्हणून त्याची आता युवासेनेच्या सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोहसीनची सहसचिवपदी नियुक्ती केली. मात्र ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपातील असून 6 महिन्यानंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून त्याला कायम करण्यात येईल, असं युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने सांगितले आहे. याबाबत युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी ट्विट करुन मोहसीनला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांच्या घराबाहेर राडा घालणाऱ्या कार्यकर्त्यांची स्वतः उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. वरुण सरदेसाई यांनी या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं होतं. त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ खडसेंना सर्वात मोठा धक्का, एवढ्या कोटी रुपयांची संपत्ती जप्त

“भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, ‘हे’ नेते माझ्या संपर्कात”; काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

‘या’ अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणार नोकरी!, राज्य सरकारची मोठी घोषणा

महाराष्ट्रात ‘या’ वेळेत पुन्हा संचारबंदी?, केंद्रानं दिल्यात स्पष्ट सूचना

‘बुलेटबंदी’ गाण्यावर रुग्णालयात नर्सचे ठुमके, आता मात्र सापडलीय संकटात!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More