बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास माझ्या वाघांनो… उद्धव ठाकरेंकडून युवासेनेच्या कार्यकर्त्यांना शाबासकी!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात शिवसेनेकडून थेट राणेंच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आल्याने वातावरण चिंताजनक झालं.

युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.

दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. या सर्व प्रकारानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून उद्धव ठाकरेंचं कौतुक केल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राज्य सरकारची झुंडशाही पाहून अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील”

नारायण राणेंना धक्क्यावर धक्के, पुन्हा अटक होणार?

शांत असलेले राऊत अखेर बोलले; “या भाडोत्रींनी भाजपलाच नागडं…”

आंदोलन राणेंविरुद्ध… गाढव, मांजर, कोंबड्यांचे मात्र प्रचंड हाल!

भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, संजय राऊत राणेंना अग्रलेखात काय काय म्हणाले?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More