बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चौकशीदरम्यान अटक झाल्यास युवराज सिंगला जामीनावर सोडा – उच्च न्यायालय

मुंबई | गतवर्षी माजी क्रिकेटपटू युवराज सिंगवर हरियाणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. युवराजनं इन्स्टाग्राम लाईव्हवर दलित समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य मात्र त्याच्या चांगलच अंगलट आलं. अशातच आता याप्रकरणी युवराजला दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचं समोर येत आहे.

हरियाणा पोलिसांनी कथित जातीवाद टिप्पणी प्रकरणात युवराज सिंगची केवळ “औपचारिक अटक” मागितली असताना, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

युवराज सिंगला चौकशीदरम्यान अटक झाली तर त्याची जामीन आणि जामीनपत्र दाखवल्यावर अंतरिम जामिनावर सुटका होईल, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती अमोल रतन सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणाला 18 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली असून पोलीस अधीक्षकांना त्यांच्या शपथपत्रात वापरलेल्या औपचारिक अटक या शब्दासंदर्भात या विषयावर आणखी काही सांगायचं असेल तर दुसरे प्रतिज्ञापत्र दाखल करावं ज्यात त्याचा अर्थ स्पष्टपणे सांगितला असेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रात वीजेची टंचाई होणार नाही?, ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“युद्ध झाले तर भारताचा पराभव अटळ”

बंजी जंपिंग जीवावर बेतलं, रस्सी तुटली अन् तीन मुलं झाली पोरकी, पाहा थरारक व्हिडीओ

“सत्तेत असून 100 टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे हे लक्षात येतं”

विराटनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडूही सोडणार आयपीएलचं कर्णधारपद?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More