मुंबई | आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलेला अभिनेते इरफान खान यांनी अकाली एक्झिट घेतली. मुंबईतल्या कोकीलाबेन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इरफान खान यांना विविध क्षेत्रातील लोक आदरांजली अर्पण करत आहेत. अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही इरफान यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इरफान यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर युवराज सिंग याने भावूक ट्विट केलं आहे. काही वर्षांपूर्वी युवराज सिंगने देखील कर्करोगाशी दोन हात केले आहेत. त्यातून तो सहीसलामत बाहेर पडला. ही वेदना मी अनुभवली आहे. तो प्रवास मी अनुभवला आहे. काही जण यावर मात करतात, पण काही जणांना ते शक्य होत नाही. इरफान तू आता नक्कीच चांगल्या ठिकाणी असशील अशी मला आशा आहे, असं युवराज आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद शामी, अनिल कुंबळे आदि क्रिकेटर्सनी इरफान यांच्याविषयी संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसंच या दुखा:त आम्ही इरफानच्या कुटुंबियांसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इरफानच्या जाण्याने बॉलिवूडकरांवरच नाही तर जागतिक सिनेमावर फार मोठा परिणाम होणार आहे. इरफान एक अभिनेता म्हणून तर ते सर्वांचे आवडते होतेच परंतू माणूस म्हणून देखील लोकांना ते तितकेच भावायचे. अनेकदा काही प्रकरणांमध्ये वा मुद्दावर ते आपली परखड मते व्यक्त करत. मात्र त्यांच्या अश्या अकाली जाण्याने सिनेसृष्टी पोरकी झाली आहे.
I know the journey I know the pain and I know he fought till the end some are lucky to survive some don’t I’m sure you are in a better place now Irfan Khan my condolence to your family. May his soul rip
— yuvraj singh (@YUVSTRONG12) April 29, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
आईच्या मृत्यूनंतर चारच दिवसात मुलानंही घेतला जगाचा निरोप
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदींनी अभिनेता इरफान खानला वाहिली श्रद्धांजली; म्हणाले…
इरफान, आमचा तुझ्यावर ‘हक्क’ आहे आणि तुझ्याशी आमचा ‘रिश्ता’ही कायम राहिल…
“इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला”
Comments are closed.