वादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला सौदी अरेबियाचं नागरिकत्व

Zakir Naik
वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईक

नवी दिल्ली | वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईकला सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलंय. इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिलंय. सौदीचे राजे सलमान यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून नागरिकत्व दिल्याचं कळतंय. 

झाकीर नाईकवर प्रक्षोभक भाषण, मनी लॉन्ड्रिंगसह दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याचे आरोप आहेत. त्याची संस्था आयआरएफवर बंदी घालण्यात आलीय. दरम्यान, नाईकविरोधात भारताने इंटरपोलकडे धाव घेतली होती, त्यामुळे सौदी अरेबियाने नाईकला नागरिकत्व दिल्याचं कळतंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या