बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकांना लसी मिळत नाहीत आणि ‘या’ तीन राज्यात वाया जातात सर्वाधिक लसी!

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षावरील लसीकरण करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या. मात्र अपुऱ्या डोसमुळे लसीकरणाची मोहीम अत्यंत मंद गतीने चालत आहे. लसीचा अपुरे डोस असल्यामुळे काही लसीकरण केंद्र बंद आहेत. अशातच केंद्र सरकारने लस वाया घालवत असलेल्या राज्यांची यादी जाहीर केली आहे.

लस वाया घालत असलेल्या यादीमध्ये झारखंड आणि छत्तीसगड ही दोन राज्य आघाडीवर आहेत. झारखंड राज्याने पुरवठा करण्यात आलेल्या एकूण लशींच्या 37.3 टक्के लशी वाया गेल्या आहेत. तर छत्तीसगडमध्ये एकूण लशींच्या 30.2 टक्के लशी वाया घालवल्या आहेत.

झारखंड आणि छत्तीसगड ही राज्य सोडून तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात  लस वाया घालवण्याचं प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत 15.5 टक्के, जम्मू काश्मीरमध्ये 10.8 टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये 10.7 टक्के इतक्या लशी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात 6.3 टक्के लशी वाया गेल्या असल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, आतापर्यंत देशात एकूण 20.6 कोटी नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यात 15.71 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस तर 4.35 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. देशात गेल्या 24 तासात 20.36 लाख लोकांना लस दिली गेली असल्याची माहिती आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

पोलिसांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचं उल्लंघन करत बर्थडे सेलिब्रेशन करणं शिवसेना नेत्याला पडलं महागात

भाजपला धक्का! 10 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती बांधलं शिवबंधन

हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी

मुंबईत आज बरे होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, पाहा आकडेवारी

“बाबा रामदेव यांनी माफी मागितली नाही, तर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More