बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून मी भटकले होते’ म्हणत या अभिनेत्रीने घेतला 18 व्या वर्षी संन्यास

मुंबई |  ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे सुपर डुपरहिट चित्रपट करून प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी युवा अभिनेत्री झायरा वसिम हिने चित्रपट क्षेत्रातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिने ही घोषणा केली आहे. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून मी भटकले होते’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिने हा निर्णय घेण्यामागे कुठलंही कारण स्पष्ट केलं नाही.

दरम्यान, वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी तिने हा निर्णय घेतल्याने बॉलिवूडला देखील जोरदार धक्का बसलाय. पाच वर्षात मी अनेकदा संघर्ष केला. लहान वयात मी एवढा संघर्ष करू शकत नाही, असं तिने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

महत्वाच्या बातम्या-

-आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली; मोदींची ‘मन की बात’

-भाजप आमदाराची सुटका झाली म्हणून कार्यकर्त्यांनी केला हवेत गोळीबार

-नदीवरील नव्या पुलाचा जोडरस्ता खचला; संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांनाच बांधलं पुलाला

-इंग्लंडला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

-पबजी खेळू न दिल्यामुळे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More