बुचामध्ये शेकडो मृतदेहांचा खच; ह्रदय पिळवटून टाकणारं दृश्य बघून झेलेन्स्की सुन्न
कीव | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) 40 दिवस होऊन गेले असले तरी हे युद्ध संपत नाहीये. रशियाकडून (Russia) सातत्याने होणाऱ्या हल्ल्यात हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियन सैनिक युक्रेनियन नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
युक्रेनमधील (Ukraine) बुचा शहारात शेकडो युक्रेनियन नागरिकांचे मृतदेह विकृत अवस्थेत आढळले. या घटनेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr zelensky) यांनी बुचा शहराचा दौरा केला. झेलेन्स्की यांचे बुचा शहराच्या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उद्ध्वस्त झालेलं शहर, शेकडो युक्रेनियन नागरिकांच्या मृतहेचा खच ही बुचामधील भयावह परिस्थिती बघून झेलेन्स्की देखील सुन्न झाले आहेत. बुचामधील ही दृश्य ह्रदय पिळवटून टाकणारी आहेत. मृतदेहांचा खच बघून झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, रशियन सैन्य युक्रेनमधील तरूणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करत असल्याचा आरोप युक्रेनच्या खासदारांनी केला आहे. दिवसेंदिवस युक्रेनमधील परिस्थिती हाताबाहेर जात असताना रशियाने त्यांचे हल्ले अधिक तीव्र केले आहेत.
President Volodymyr Zelensky visited Bucha, a town northwest of Kyiv, which became the site of Russia’s bloody massacre with hundreds of civilian victims, on April 4.
Photo: AFP, Anadolu Agency/Getty Images pic.twitter.com/rvQaxoM3Yt
— The Kyiv Independent (@KyivIndependent) April 4, 2022
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही उद्या म्हणाल मी घराबाहेर पडत नाही तोपर्यंत…”
रशियन सैनिकांची विकृत मानसिकता; धक्कादायक माहिती समोर
दोन मुलांचा पिता असलेला ‘हा’ अभिनेता आहे रश्मिकाचा क्रश, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का
लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
जो बायडन यांनी पुतिन यांना दिला गंभीर इशारा, म्हणाले…
Comments are closed.