बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आम्हाला थेट मॅसेज करा’; पाकिस्तान टीमसाठी झोमॅटोचं ट्विट

मुंबई | टी-20 विश्वचषक स्पर्धेत म्हणजेच आज भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. त्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे फॅन्स सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोलही करतायत. अशातच फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोही मागे नाहीये.

झोमॅटोने एक ट्विट केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमला डिवचणारं हे झोमॅटोचं ट्विट असून अवघ्या काही काळातच याला अनेकांनी रिट्विट आणि लाईक केलं आहे.

डिअर पाकिस्तान संघ, आज रात्रीसाठी तुम्हाला बर्गर आणि पिझ्झा हवा असेल तर आम्हाला थेट मॅसेज करा, असं ट्विट झोमॅटोनं केलं आहे. या ट्विटचा संबंध थेट 2019साली झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकपशी जोडलेला आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघातील खेळाडूंनी बर्गर, पिझ्झा खाल्ला होता असा दावा पाकिस्तानच्या एका चाहत्याने केला होता. त्यावेळी या चाहत्याचा व्हीडियो चांगलाच व्हायरल झाला होता.

दरम्यान, रविवारी सायंकाळी बरोबर 7 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विराट कोहली आणि बाबर आजम हे जगातील दोन अव्वल फलंदाज समोरासमोर येतील. भारत-पाकिस्तान यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. 2019 च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘या’ तारखेपासून पुन्हा पाऊस बरसणार; शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

‘…तर पुन्हा कोरोनाची भयावह लाट येऊ शकते’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन, म्हणाले…

भार-पाक मॅच देशहितविरोधी म्हणणाऱ्या रामदेव बाबांना नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More