तंत्रज्ञान

जिओमीट हुबेहुब झूमसारखं; झूम जिओला कोर्टात खेचणार?

नवी दिल्ली | लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्राॅम होमच्या संस्कृतीला चांगलेच सुगीचे दिवस आले. या काळात झूम हे व्हिडीओ काॅन्फरन्सिंग अ‍ॅप भारतात फारच लोकप्रिय ठरलं. व्हिडीओ काॅन्फरन्सिंगची लोकांची वाढती गरज लक्षात घेता जीओनंही JioMeet अ‍ॅप लाॅन्च केलं. यावरूनच आता झूम आणि जिओमीट आमनेसामने आले आहेत.

जीओमीट अ‍ॅपचा युजर इंटरफेस, अ‍ॅप आइकाॅन आणि फिचर्स अशा सर्वच बाबी झूमशी मिळत्याजुळत्या आहेत, असा आरोप झूमने केला आहे. यावरूनच झूम लवकरच जीओमीटवर कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झूम व्हिडीओ कम्युनिकेशन्सचे भारतातील प्रमुख समीर राजे म्हणाले की, रिलायन्स जीओचं नुकतंच लाॅन्च झालेल्या JioMeet आणि झूममधील साम्य पाहून थक्कच झालो. आम्हाला हे असं होणार याची कल्पना होती…पण ठीक आहे…कारण याआधीदेखील झुमनं बऱ्याच वेळा स्पर्धकांचा सामना केला आहे.

दरम्यान, झूम चिनी नव्हे तर अमेरिकी कंपनी असल्याचं समीर राजे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. आमचं प्रोडक्ट आणि टॅक्नाॅलाॅजी आमची खरी ताकद आहे, असं सांगायलाही समीर राजे विसरले नाहीत.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

विकास दुबेचं मुख्यमंत्री कनेक्शन, ‘या’ राजकीय पक्षात होता दुबेचा चांगलाच दरारा!

धक्कादायक व्हिडीओ!; विकास दुबेचा एन्काऊंटर होण्याआधी मीडियाच्या गाड्या अडवल्या

विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या