बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरू

मुंबई | राज्यातील मोठ्या शहरांमध्ये इमारती कोसळण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडत आहेत. त्यातच आता मुंबईमध्ये पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

सदर घटना मुंबईतील वांद्रे पुर्व येथील बेहराम परिसरात घडली आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 6 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहेत का, याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

या इमारत दुर्घटनेमध्ये अजून 5 ते 10 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेस्थली पाच फायर इंजिन, एक रेस्क्यु व्हॅन आणि रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अद्यापही या दुर्घटनेचे योग्य कारण कळू शकलेलं नाही. एका आठवड्यामध्ये मुंबईमध्ये ही तिसरी दुर्घटना घडली आहे. यामुळे मुंबईमधील इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आहे.

दरम्यान, महानगर पालिका वेळोवेळी उंच बहुमजली इमारतींमधील मंजूर आराखड्यांनुसार संरचना आणि अग्नीशमन उपाययोजना यांचे परिक्षण करत असते. अशा परिस्थितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास कारवाई केली जाते. यापुर्वी कमला इमारत दुर्घटनेप्रकरणी दुर्लक्ष केल्याबद्दल नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

थोडक्यात बातम्या- 

दरीत अडकलेल्या ट्रकचा थरारक व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

Corona Update: पुण्यात ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद, वाचा आजची आकडेवारी

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

शाळा बंद पण शिक्षण चालू! स्मार्टफोन नसल्याने विद्यार्थ्यांसाठी राबवला जातोय अनोखा उपक्रम

कोरोनातून लवकर बरं व्हायचं असेल तर ‘या’ गोष्टी खाण्याच्या टाळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More