‘मोराचं लग्न झालं रे…’; मित्राच्या लग्नात मोर बनलेला स्वत:च्या लग्नातही थिरकला, व्हिडीओ पुन्हा व्हायरल
पुणे | घरात कोणाचं लग्न असो किंवा आपल्या अगदी जवळच्या जीवा भावाच्या मित्राचं लग्न असो… यात मजा मस्ती आलीच. अशा कार्यक्रमांमध्ये तसेच लग्नाच्या वरातीत तरूणाई, बच्चे कंपनी, लहान थोर सगळेच मनसोक्त नाचताना दिसतात.
वरातीत कोण कसं नाचेल हे काही सांगता येत नाही. अशाच एका लग्नाच्या वरातीतील तरूणाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याआधी आपण नागिन डान्स खूपवेळा पाहिलाय. पण सोशल मीडियावर तरूणाचा मोर डान्स व्हायरल झाला होता.
साधारण एक ते दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा होता. अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या व्हॉट्स अपच्या स्टेटसला ठेवलेला. आता या तरूणाचं लग्न झालं. यातही त्याने केलेला डान्स तूफान व्हायरल झालाय.
अनेकांनी या तरूणाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच Being Marathi या पेजने या तरूणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
थोडक्यात बातम्या-
प्राजक्ता माळीचा ‘रान बाजार’मधील बोल्ड अवतार पाहून नेटकरी संतापले!
संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…
‘तारक मेहता’ मालिकेच्या चाहत्यांना मोठा झटका, अत्यंत वाईट बातमी समोर
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात
Comments are closed.