Top News महाराष्ट्र मुंबई

आता कुमार सानूची ‘जान वाचणं’ कठीण आहे!- शालिनी ठाकरे

मुंबई | बिग बॉसच्या 14 पर्वात गायक जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल उच्चारलेल्या अपमानकारक शब्दांमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्याला स्पर्धेतून हाकलून लावण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीचा अपमान केलास. आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. जान कुमार सानूवर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. यामध्ये मनसे नेते अमेय खोपकर यांनीही टीका केली आहे तर शिवसेनेनेही जान कुमार सानूवर निशाणा साधला आहे.

जान कुमार सानू मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी, असा धमकीवजा इशारा खोपकरांनी दिला आहे.

दरम्यान, बिग बॉसमधील खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचं म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘भाजपची भूमिका डबल ढोलकी’; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

‘हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे’; मराठा आरक्षणावरून पाटलांचा गौप्यस्फोट

‘दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केला’; उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही?”

‘राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने…’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना चिमटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या