Top News

“आघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं”

रायगड | आमची आघाडी म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा मजबूत जोड आहे. कदाचित आता तीनही पक्षांचा भविष्यातील निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णयही झाला असेल, असा दावा शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय.

अब्दुल सत्तार यांनी आज अलिबाग येथे चक्रीवादळ, परतीचा पाऊस यामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं एक हाती सरकार म्‍हणजे जे सरकार आहे त्‍याचे दोन बाजूचे हात आणि आमचं सरकार. भगवं सरकार 5 वर्षे टिकलं पाहिजे असा त्‍याचा अर्थ असावा, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय.

सज्‍ज रहा म्‍हणजे देशाच्‍या सीमेवर जसा सैनिक सज्‍ज असतो तसा शिवसैनिकही सज्‍ज असला पाहिजे. कारण कधीही काहीही होवू शकतं, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला हा महत्वाचा निर्णय

“शिवसेनेचा भगवा फडकेल पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील”

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

‘ठाकरे सरकार आणि बीएमसीनं केला 900 कोटींचा जमीन घोटाळा’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या