मालवण | लग्नासाठी निघालेल्या नवरीच्या गाडीचा अपघात झाला. हाताला लागलेलं असतानाही नवरीने लग्न मंडपात पोहोचून लग्न केलं.
लग्नासाठी निघाले असताना मालवण तालुक्यातील कसाल-कट्टा मार्गावर हा अपघात झाला. त्यात नवरीसह तिचे आई-वडील, बहीण आणि भाऊ यांनाही दुखापत झाली, नवरीचा हात या घटनेत फ्रॅक्चर झाला. अपघातामुळे सकाळी साडेबाराचा मुहुर्त टळला.
दरम्यान, नवरीची लग्नाची इच्छा प्रबळ होती. त्यामुळे उपचार घेऊन नवरी दुपारी 3 वाजताच्या मुहुर्तावर लग्न मंडपात पोहोचली आणि लग्न पार पडलं. तिच्या या धैर्याचे सर्व कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!
-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा