बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चित्रपटसृष्टीवर शोककळा! ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याचं दु:खद निधन

मुंबई | अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले जेष्ठ अभिनेते युसूफ हुसेन यांचं आज पहाटे निधन झालं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि युसूफ हुसेन यांचे जावई हंसल मेहता यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. युसूफ यांच्या निधनाने हंसल मेहता अतिशय भावुक झाले आहेत. त्यांनी ट्विटमधून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

युसूफ यांना कोरोना झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हुसैन यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांनी दिल चाहता है, धुम, दबंग-3, क्रेझी कुक्कड फॅमिली, संगम, खोया खोया चांद, ओ माय गॉड, क्रिश-3 यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

हंसल मेहता पोस्टमध्ये म्हणाले, मी शाहिद चित्रपटाची शुटींग करताना मी दोन शेड्युल पुर्ण केले होते. पण आर्थिक अडचणींमुळे मी अडकलो होतो. दिग्दर्शक म्हणून माझं करिअर संपुष्टात येणार होतं. त्याचवेळी युसूफ माझ्याजवळ आले आणि म्हणाले माझ्याकडे फिक्स्ड डिपॅाजिट आहे. मला त्याचा काहीही उपयोग नाही, असे सांगत त्यांनी चेकवर सही केली आणि शाहिद चित्रपट पुर्ण झाला. हा अनुभव सांगत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे, युसूफ माझे सासरे नाही तर ते माझ्या वडीलांसारखे होते. आज मी खऱ्या अर्थाने पोरका झालो आहे. यानंतर माझं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही, असं सांगत त्यांनी भावना व्यक्त केल्या. युसूफ हुसैन यांची मुलगी सफिना हुसैन ही हंसल मेहता यांची पत्नी आहे. हुसैन यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांचं निधन झालं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

थोडक्यात बातम्या-

आर्यनच्या सुटकेनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं शाहरुखसाठी खास ट्विट, म्हणाली…

UPSC पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर! मुख्य परिक्षेसाठी पुन्हा भरावा लागणार अर्ज

अखेर आर्यन खानची सुटका, 27 दिवसानंतर तुरुंगांबाहेर

काय सांगता! पेट्रोल चक्क 121 रुपये प्रतिलिटर, सर्वसामान्यांचा जीव मेताकुटीला

” हे बघुन तुमच्या तरी घशाखाली घास उतरतोय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More