बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसल्यानं 3 वर्षाची चिमुकली एकटीच गेली डाॅक्टरकडे

नवी दिल्ली | जगभर कोरोनानं थैमान घातलं आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यातच ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाबद्दल रुग्णांच्या मनात भीती असल्यानं टेस्ट म्हटलं तरी घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच कोरोनाविषयी सतर्कता घेत एका 3 वर्षाच्या चिमुकलीनं तिला सर्दी-खोकला जाणवला म्हणून थेट हाॅस्पिटल गाठलं आहे.

या चिमुकलीचं नाव लिपवी असून नागालँडच्या झुन्हेबोटो जिल्ह्याच्या घटाशी तालुक्यात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. ‘दी मोरंग एक्स्प्रेस’ या स्थानिक वर्तमानपत्रानुसार, लिपवीला सर्दी आणि खोकल्याची सामन्य लक्षणं होती. तिचे आई-वडील हे शेतात काम करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे तिने एकटीनेच हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये चेकअप करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

बेंजामिन येप्थोमी यांनी ही मुलगी आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं की, जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांच्या लिपवीला हेल्थ सेंटरमध्ये पाहिलं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे.

दरम्यान, 3 वर्षाची लिपवी एकटीच मास्क लावून हेल्थ सेंटरमध्ये आलेली पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या कृतीचं सर्वजणच कौतुक करत असल्यांचं दिसून येत आहे. सध्या तिचा डॉक्टरसोबतचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”

आपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आवरलं नाही रडू, पाहा व्हिडीओ

पाच दिवसाच्या बाळासह ओढ्यात अडकली होती ओली बाळंतीन, माऊलींनी वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

‘लाॅकडाऊन करूनही फारसा फायदा झाला नाही’; हसन मुश्रीफांचं धक्कादायक वक्तव्य

सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही- प्रविण दरेकर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More