Top News खेळ

अर्जुन तेंडुलकर मेहनती मुलगा; अंबानींकडून सचिनच्या मुलाचं तोंडभरुन कौतुक!

Photo Courtesy- Instagram/Arjun Tendulkar & Facebook / @iNitaAmbani

मुंबई | यंदा होणाऱ्या आयपीएलचा लिलाव चेन्नईमध्ये पार पडला. या लिलावाकडे सर्व क्रिकेटप्रमींचं लक्ष लागलेलं होतं. या लिलावामध्ये क्रिकेट जगतावर राज्य करणारा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या लिलावामध्ये सहभागी झाला होता. मुंबई इंडियन्सचा आयकॉन प्लेअर असलेल्या सचिनच्या मुलाला आधी कोणीही बोली लावली नाही. शेवटच्या राऊंडमध्ये त्याला मुंबईने खरेदी केलं. यावर मुंबई संघाचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांनी अर्जुनच्या निवडीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुनकडे गुणवत्ता असून तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाजही आहे. जगात असे फार कमी क्रिकेटपटू आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्य युवा खेळाडूंप्रमाणे त्याची प्रगती होत गेली आहे. मुंबई इंडियन्स त्याला आणखी सहकार्य करेल अर्जुनलाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, असं आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

ज्या प्रकारचं वातावरण मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात आहे त्याचा अर्जुनला फायदाच होईल. अन्य युवा खेळाडूंप्रमाणे आगामी काळात अर्जुनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल, अशी आशा आहे, असंही आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या सचिनचा मुलगा अर्जुनला संघात सामिल करताना वशिलेबाजीवरून ट्रोल केलं जात आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस याच्यासाठी तब्बल 16.25 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. केवळ 75 लाख इतकी बेस प्राईज असलेल्या मॉरिससाठी 16.25 कोटी राजस्थान रॉयल्सने मोजले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे सरकारचे शिवजयंतीवर निर्बंध मात्र शरद पवारांच्या उपस्थितीत मटणपार्टीला परवानगी”

गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी!

एकत्र शिकणाऱ्या दोन मैत्रिणी पळाल्या, पोलिसांनी पकडल्यावर समोर आलं धक्कादायक कारण!

….म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स संघात घेतलं- माहेला जयवर्धने

पत्नीच्या निधनानंतर शेजारच्या मुलीवर जडला जीव, लग्नास नकार देताच केला खुनी खेळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या