…ही कागदपत्रं नसतील तर तुम्हाला घरपोच दारु मिळणार नाही!

…ही कागदपत्रं नसतील तर तुम्हाला घरपोच दारु मिळणार नाही!

मुंबई | घरपोच दारु देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मात्र अशाप्रकारे घरपोच दारु हवी असणाऱ्यांना काही कागदपत्रे देखील द्यावी लागणार असल्याचं कळतंय. महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिलीय. 

ऑनलाईन दारु मागवण्यासाठी वयाचा दाखला तसेच आधार कार्डसह संपूर्ण माहिती घेऊन ओळख पटवली जाईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, वयाचा पुरावा आणि आधार कार्ड नसेल तर ऑनलाईन दारु मिळणार नाही. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 

दरम्यान, ड्रंक आणि ड्राईव्हमुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार असल्याचं कळतंय. हा निर्णय झाला तर असा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी

-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी

-मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय- चंद्रकांत पाटील

-आता महाराष्ट्रात दारूही मिळणार घरपोच?

Google+ Linkedin