बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार निधीत एवढ्या कोटींची वाढ; अजित पवारांची मोठी घोषणा!

मुंबई |  महाराष्ट्राचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. कोरोना महामारीमुळे राज्यातील आमदारांच्या पगारात कपात करण्यात आली होती. ती कपात मागे घेण्याचा निर्णय आता अर्थमंत्र्यांनी घेतला आहे.

संपूर्ण राज्य कोरोना संकटात सापडलं असताना सरकारवर जबाबदारीच ओझं वाढलं होतं. आणि सरकारी तिजोरीवरही त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत होता. त्यामुळे आमदारांच्या मासिक वेतनामध्ये 30 टक्के कपात करण्यात आली होती. आता ती कपात मागे घेऊन वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय सभागृहात अजित पवार यांनी वाचून दाखवला.

अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या जाहीरनाम्याची आठवण करून दिली. त्यावर अजित पवारांनी हे 3 पक्षाचं सरकार आहे त्यामुळे काहीतरी जुळवाजुळव करावी लागते. कोणत्या एका पक्षाचं सरकार असतं तर गोष्ट वेगळी होती. त्यामुळे, जादूची कांडी फिरवल्यासारखं काहीच होत नाही असं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर दिलं.

अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत बोलत असताना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा आमदार निधी आता 1 कोटी रुपयांनी वाढवणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. याआधी 3 कोटी रुपये आमदार निधी मतदारसंघाच्या विकासासाठी मिळत होता. पण, आता नवीन घोषणेनुसार प्रत्येक आमदाराला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाच सर्वपक्षीय आमदारांनी स्वागत केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांची चिंता वाढली; आजपासून कठोर निर्बंध

धक्कादायक! रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयनं फोडलं तरुणीचं नाक, कारण ऐकून तुम्हाही व्हाल हैराण

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक

‘…म्हणून वाझेंना पोलिस दलात घेण्यात आलं’; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

“सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More